Film Song – असा मी अशी मी – सूर तेच छेडता

Avadhoot
तुला मी पाहतो
तुझ्यात हरवतो
का, तरी टाळतो
नजर ही तुझी

कळले न मला
कळले न तुला
बघ कसा जीव गुंतला
सूर तेच छेडता…

Vaishali
तुला मी पाहते
जराशी लाजते
आवरू लागते
मोह हा तुझा

कळले न मला
कळले न तुला
बघ कसा जीव गुंतला
सूर तेच छेडता…

अंतरा १:

Vaishali –
माझे हे रोजचे
मलाच शोधणे
स्वतःशी हासणे
कसे थांबवू

Avadhoot –
जगावेगळी
मी वाट चालतो
तुझे स्वप्न मग
कसे पांघरू?

Vaishali –
कळले न मला
कळले न तुला
हा कुणी श्वास रोखला…
सूर तेच छेडता

अंतरा २-

Avadhoot –
गुलाबी तुझी
ओढ लागली
साथ ही तुझी
गोड वाटली

Vaishali –
दरवळून ये
भेट आपुली
सोबती तुझ्या
ऊब दाटली

Avadhoot –
कळले न मला
कळले न तुला
रंगली रात आज का
सूर तेच छेडता

:- Shripad Arun Joshi

February 2023

Lyrics :- Shripad Arun Joshi
Music :- Nilesh Moharir
Movie 🎥 – Asa Mi Ashi Mi

Leave a comment