Film Song- असा मी … अशी मी- मन तुटले-

Anagha
रात होती सावळी
आता पसरली काजळी
रंगून का हा खेळ संपला?…
जे जसे वाटले होते
ते तसे मुळीच नव्हते
विरणारे लाभले का क्षण असे…?
मन तुटले असे कसे
गहिवरले असे कसे
जे घडले जसे
ते का घडले तसे ?…
मन तुटले असे कसे
… तुटले

Vaibhav

नाही कळली डोळ्यांमधली
माझी ओढ कुणाला
तडे सावलीस जाताना
येई ऊन भराला

कोण जवळी येता येता
दूर दूर गेले
बंध कोणते हे ज्याचे
धागे उसवले….

मन तुटले असे कसे
गहिवरले असे कसे
जे घडले जसे
ते का घडले तसे….
मन तुटले असे कसे
तुटले.

Anagha
ओघळते अवेळी कुठली
दाटून खिन्नता माझी
मन दुखते, दुखत राहते
वागवून कसली ओझी…
हे क्षण एकाकी माझे
येतात पुन्हा का मागे…
छळणारे उमटती का
हे ठसे
मन तुटले असे कसे
तुटले

Vaibhav

मिटवून कसा मी मिटवू
कल्लोळ शांततेमधला
मी मला बिलगतो तेव्हा
हा टाहो आता कसला…
पानावर ओघळणारे
दवबिंदू क्षणात *विरले*
*अन् कशाने हरवले ते कवडसे*
मन तुटले असे कसे

– Shripad Arun Joshi

Leave a comment